राहुरी ः राहुरी तालुक्यातील मुळा धरण परिसरातील एका ३६ वर्षीय महिलेला बंदुकीचा धाक दाखवून विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेले आहे.
तरच तूझा विषय सोडून देईल. असे म्हणत त्या महिलेचा विनयभंग करून तिच्याकडून तीन लाख रूपये खंडणी वसूल केल्याप्रकरणी शुक्रवार दि 1 ऑक्टोबर रोजी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिनांक ३० सप्टेंबर रोजी सायंकाळी सव्वासात वाजे दरम्यान राहुरी तालुक्यातील मुळा धरण परिसरातील एक ३६ वर्षीय विवाहित महिला एक कार्यक्रम आवरून घरी जात होती. त्याच वेळी सुनिल लोखंडे याने राहुरी परिसरात त्या महिलेच्या वाहनाला अचानक आपले वाहन आडवे लावल.
त्यानंतर त्याने त्या महिलेला बंदुकीचा धाक दाखवून जबरदस्तीने स्वतःच्या वाहनात बसवून तिचे अपहरण केले. तू माझ्याशी बोलत नाहीस. मला का टाळतेस. मला निवांत भेटायला बाहेर का येत नाही. अशी विचारणा केली.
तू माझ्या संपर्कात राहून माझ्याशी शारीरीक संबंध ठेव. मला टाळू नकोस. मी सांगेल तेव्हा मला बाहेर भेट. नाहीतर मला पाच लाख रूपये दे. तरच तूझा विषय सोडून देईल, ्असे म्हणून संबंधित महिलेचा विनयभंग केला.
या प्रकरणी राहुरी पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
Post a Comment