नगर : नगर शहराजवळील वाकोडी फाटा परिसरात एका चिंचेच्या झाडाखाली सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर भिंगार कॅम्प पोलिसांच्या पथकाने छापा टाकत ७ जुगान्यांना पकडले आहे. त्यांच्याकडून जुगाराची साधने, रोख रक्कम असा १ लाख ७३ हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
वाकोडी फाट्यावर मोठ्या प्रमाणात तिरट नावाचा जुगार खेळला जात असल्याची माहिती मिंगार कॅम्प पोलिस ठाण्याचे साहायक निरीक्षक शिशीरकुमार देशमुख यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे स.पो. नि. देशमुख, उपनिरीक्षक सतिश शिरसाठ, पो. ना. भानुदास खेडकर यांच्यासह पथकाने वाकोडी फाटा येथे जावून छापा टाकला असता ७ जुगारी तेथे तिरट नावाचा जुगार खेळत असल्याचे आढळून आले.
त्यांना ताब्यत घेऊन त्यांच्याकडून ६ हजार ६४० रुपये रोख, ६ मोबाईल, ३ मोटारसायकल तसेच गाराचे साहित्य असा १ लाख ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तमत करण्यात आला. या जुगान्याविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Post a Comment