घरात घुसून महिलांना मारहाण...

राहुरी ः राहुरी शहरातील खाटीक गल्ली येथे एका घरात जनावरांची कत्तल होत आहे,  असे सांगून दोघेजण एकाच्या घरात घुसले व घरातील महिलांना बेदम मारहाण केली. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.


प्रसाद मधुकर गाडे व आबा नाईकवाडे हे दोघे राहुरी पोलिस ठाण्यात गेले आणि शहरातील खाटीक गल्ली येथे एका घरात जनावरांची अमानुषपणे कत्तल होत आहे, अशी माहिती पोलिसांना दिली.


त्यानंतर ते दोघे खाटीक गल्ली येथील अझीम रज्जाक सय्यद यांच्या घरात अनधिकृतपणे घुसले. यावेळी सय्यद यांच्या घरातील महिला नमाज पठण करत होत्या. त्यावेळी त्यांनी महिलांना धक्काबुक्की करून तुमच्या घरात जनावरांची कत्तल होते, असे म्हणून पैशाची मागणी केली.

त्यांच्या अंगावरील दागिने ओरबडण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती सय्यद यांच्या घरातील महिलांनी दिली. यावेळी जमलेल्या तरुणांनी प्रसाद गाडे व आबा नाईकवाडे यांची धुलाई करत त्यांना पोलीस ठाण्यात दिले. 

याबाबत राहुरी पोलिसांनी गाडे व नाईकवाडे यांच्यावर बळजबरीने घरात घुसून मारहाण केल्याप्रकरणी गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास राहुरी पोलिस करीत आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post