नगर ः जिल्ह्यातील विविध चार महामार्गांचे भूमिपूजन व चार महामार्गांचे लोकार्पण आज (ता.दोन)ला करण्यात आले. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी एकत्र आले होते. परंतु या कार्यक्रमाला माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील अनुपस्थित होते. त्यांच्या या अनुपस्थितीची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.
या कार्यक्रमाला पालकमंत्री हसन मुश्रीफ, मंत्री प्राजक्त तनपुरे, खासदार सुजय विखे पाटील, सदाशिव लोखंडे, प्रा.राम शिंदे, बबनराव पाचपुते, आमदार रोहित पवार, आमदार अरुणकाका जगताप, आमदार मोनिका राजळे, आमदार संग्राम जगताप, जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले पाटील, शिवाजीराव कर्डिले आदी उपस्थित होते. परंतु माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील अनुपस्थित दिसले. त्याबाबत सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झालेली आहे.
नगरमधील कार्यक्रमासाठी आज राधाकृष्ण विखे पाटील व शरद पवार एकत्र येणार होते. साथीला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी देखील होते. पण या महत्त्वाच्या कार्यक्रमाला राधाकृष्ण विखे पाटील यांनी दांडी मारली आहे. त्यांनी पवारांसोबत एकाच मंचावर हजेरी लावण्याचे टाळले असल्याचे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.
नगरमध्ये कार्यक्रम होत असल्याने राधाकृष्ण विखे पाटील यांची हजेरी अपेक्षित होती. शरद पवार आणि नितीन गडकरी यांनी एकाच हेलिकॉप्टरमधून पुणे ते नगर हवाईप्रवास केला. सकाळी पावणे अकराच्या सुमारास ते नगरमध्ये दाखल झाले. राधाकृष्ण विखे पाटील यांचे सपुत्र खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी त्यांचं जंगी स्वागत मात्र केले.
Post a Comment