नगर ः आमदार निलेश लंके यांच्या छोटेखानी घराची नेहमीच चर्चा झडली आहे. त्यांच्या घरी राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी भेट दिलेली आहे. आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भेट दिली.
कोरोना काळात आमदार निलेश लंके यांनी केलेल्या कामामुळे राज्यभर त्यांच्या नावाची चर्चा झालेली आहे. त्याबरोबर लंके यांच्या हंगा येथील छोटेखानी घराचीही त्यामध्ये चर्चा झालेली आहे.
आमदार लंके यांच्या घरी राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी भेटी देऊन त्यांच्या कुटुंबियांशी चर्चा केलेली आहे. आज शरद पवार यांनी हंगा येथील भेट दिली. यावेळी शरद पवार यांनी आमदार लंके यांच्या आई-वडिलांशी संवाद साधला.
आ.लंके यांचा साधेपणा राष्ट्रवादीच्या नेत्यांना थेट आर. आर. आबा पाटील यांची आठवण करून देतो. पाटील यांचेही राहणीमान साधेच होते. तसेच आमदार लंके यांचेही राहणीमान साधेच आहेत.
यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, आमदार रोहित पवार यांच्या सह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Post a Comment