​ नगर ते माहूरगड दर्शन यात्रेचा शुभारंभ

नगर ः केडगाव येथून नवरात्र उत्सव निमित्ताने महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळातर्फे अहमदनगर ते माहूरगड दर्शन यात्रेसाठी सोडण्यात येणाऱ्या एसटी बस सेवेचा शुभारंभ केडगाव येथे सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल महाराज कोतकर यांच्या हस्ते करण्यात आला. 


दर्शन यात्रेच्या एसटी बसची सुरुवात केडगाव येथील रेणुकामाता मंदिर येथून प्रस्थान करण्यात आली. नवरात्र उत्सव मागील दोन वर्षांपासून कोरोनाच्या सावटामध्ये गेल्याने यावर्षी महाराष्ट्र सरकारने मंदिराचे दारे उघडी केली आहेत. याच अनुषंगाने जास्तीत जास्त भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे, आवाहन सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल महाराज कोतकर यांनी केला आहे. 

ही एसटी बस अहमदनगर शहरातील सक्कर चौक येथून सकाळी सात वाजता प्रस्थान करत औरंगाबाद, जालना, औंढा नागनाथ, हिंगोली, कळमनुरी करून माहूरगड येथे पोहोचणार आहे.  

यावेळी एसटी बस महामंडळ व्यवस्थापक अभिजीत वाघ, वाहतूक अधीक्षक विठ्ठल केंगारकर, अमोल सोमवंशी, अरुण आव्हाड, प्रविण जाधव, महेश म्हस्के, किशोर केरोवकर, दिनेश कोतकर पोपट कांबळे, राजेंद्र गोरे, हरिदास कोतकर, मनोज कोतकर, उत्तम मुरूमकर, सतीश वाळुंज, राजू वाघमोडे, रामभाऊ सुरसे आदी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post