नवी दिल्ली : भारतातही ओमायक्रॉनचा धोका वाढला आहे. कोरोनाचे वाढता धोका पाहता आता डीसीजीआयने लहान मुलांच्या आपत्कालीन लसीकरणाला मंजुरी दिली आहे.
तिसर्या लाटेचा धोका लक्षात घेता डीसीजीआयने 12 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांसाठी लसीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली आहे. ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी ही दिलासादायक बाब आहे. भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सीनला ही परवानगी मिळाली आहे.
एका अहवालानुसार एसईसीने ऑक्टोबरमध्ये डीसीजीआयकडे लहान मुलांना आपत्कालीन परिस्थितीमध्ये कोव्हॅक्सीन देण्यासंदर्भातील प्रस्ताव दिला होता. या प्रस्तावाला अखेर मंजुरी मिळाली आहे. ही आनंदाची बातमी आहे.
भारतात लहान मुलांच्या वापरासाठी मान्यता मिळालेली कोव्हॅक्सीन ही दुसरी लस आहे. कोरोना विरुद्ध लढण्यासाठी लहान मुलांना कोव्हॅक्सीन देण्यात येईल. त्यासाठी आता डीसीजीआयकडून मान्यता मिळाली आहे.
Post a Comment