लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त साकारले आकर्षक शुभेच्छापत्रे



नगर :  लाडक्या नेत्याच्या वाढदिवसानिमित्त शालेय बालगोपालांनी आकर्षक शुभेच्छापत्रे साकरली. शहरातील रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बनवलेले आकर्षक शुभेच्छापत्रे पोस्टाने त्यांना पाठविण्यात आली.

विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पनाशक्तीने आकर्षक शुभेच्छापत्र साकारले होते. शरद पवार यांचे रेखाटलेले चित्र, त्यांच्यावर कविता, त्यांच्या विविध छायाचित्रांचा समावेश करुन शुभेच्छापत्रे आकर्षकपणे सजविण्यात आली होती. 



एका विद्यार्थ्याने सातारा येथे शरद पवार यांचे भर पावसात झालेल्या भाषणाचे हुबेहुब चित्र रेखाटून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

मुख्याध्यापक शिवाजीराव लंके यांच्या कल्पनेतून रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ना. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छापत्र बनवा स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेत 192 मुलांनी सहभाग नोंदवला. यामधील 81 शुभेच्छापत्र निवडून ती पोस्टाने शरद पवार यांना 81 व्या वाढदिवसानिमित्त पाठविण्यात आली आहे. 


या स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. या उपक्रमासाठी विभागप्रमुख सुजाता दोमल, उर्मिला साळुंके, मीनाक्षी खोडदे, सचिन निमसे, राहुल शिंदे, शितल रोहोकले ,जयश्री खांदोडे, इंदुमती दरेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 

या उपक्रमाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य दादाभाऊ कळमकर, जनरल बॉडी सदस्य ज्ञानदेव पांडुळे, अभिषेक कळमकर, माध्यमिकचे मुख्याध्यापक सुभाष ठुबे यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post