पारनेर : निघोज व परिसरात विजेचा सावळा गोंधळ सुरू असून विजमंडळाच्या विरोधात शुक्रवार 24 डिसेंबरला सकाळी साडेनऊ वाजता निघोज देवीभोयरे रस्ता रोको आंदोलन करुन जागरण गोंधळ घालण्याचा इशारा निघोज ग्रामस्थ व संदीप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ तसेच तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष मंगेशशेठ लाळगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, तहसीलदार, पोलीस निरीक्षक व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना पाठवीण्यात आल्या आहेत.
या निवेदनात वराळ यांनी म्हटले आहे की गेली महिना दोन महिन्यांपासून विजेचा अनियमीतपणा सुरु आहे. तसेच वीज ग्राहकांच्या बिलामध्ये फार मोठा फरक आढळत आहे. निघोज येथील विज अधिकाऱ्यांना वेळोवेळी तक्रार करुणही विज ग्राहकांना न्याय मिळत नाही. सध्या कांदा लागवड मोठ्या प्रमाणात सुरू आहे.
कांदा हे या भागातील शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न देणारे महत्वपूर्ण शेती उत्पादन आहे. मात्र सध्या कांदा लागवड सुरू आहे. वीज पुरवठा सातत्याने खंडीत होत असल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.विजेचा पुरवठा खंडित न करता विज पुरवठा सातत्य ठेवणे गरजेचे आहे.
वीज मंडळाचे अधिकारी केलेल्या तक्रारीची दखल न घेता दुर्लक्ष करतात.असा प्रकार अनेक वेळा झाला आहे. वेळच्यावेळी विजेचे बिल भरणारे ग्राहक व शेतकरी यांच्यावर हा एक प्रकारे अन्याय आहे. या विरोधात आंदोलन करण्या शिवाय पर्याय नाही. अशी मानसिकता विज ग्राहक, शेतकरी व जनतेची झाली आहे.
यासाठी शुक्रवार दि.२४ डिसेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजता वीज सबस्टेशन परिसरातील निघोज देवीभोयरे रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करुण जागरण गोंधळ कार्यक्रम करण्याचा निर्णय संदीप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशन व निघोज ग्रामस्थ यांनी घेतला आहे.
या आंदोलनाला जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संदीप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशन व निघोज ग्रामस्थ यांनी केले आहे.
Post a Comment