कर्जतमध्ये भाजपाचे आंदोलन सुरूच...राम शिंदे यांचे मौनव्रत कायम... फेरनिवडणूक कार्यक्रम राबविण्याची मागणी...

कर्जत : कर्जत नगरपंचायतीच्या उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या दिवशी नाट्यमय घडामोडी घडल्याने अखेर माजीमंत्री राम शिंदे यांनी प्रशासनास जाब विचारला. त्यानंतर राम शिंदे यांनी ग्रामदैवत संत श्री सदगुरु गोदड महाराज यांच्या मंदिरात मौन व्रत धारण करीत आंदोलन सुरू केले आहे. 


कर्जत नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक सुरू असून रविवारपर्यंत सर्वत्र शांतता असणारी निवडणूक सोमवारी उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या दिवशी वादळी ठरली. 

जोगेश्वरवाडी प्रभाग क्रमांक २ च्या भाजपाचे अधिकृत उमेदवार नीता अजिनाथ कचरे यांच्यावर विद्यमान लोकप्रतिनिधी यांनी दबाव आणत त्यांना माघारी घ्यायला लावला अशी माहिती माजीमंत्री राम शिंदे यांना मिळाली असता त्यांनी तात्काळ कर्जत नगरपंचायत कार्यालयात धडक घेत प्रशासनास लोकशाहीचा अपमान करीत असल्याचा आरोप केला. 

यावेळी माजीमंत्री राम शिंदे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी डॉ अजित थोरबोले आणि सहायक गोविंद जाधव यांना जाब विचारला. नीता कचरे यांना उमेदवारी अर्ज माघार घ्यायला ज्या व्यक्तीने आणले त्यांना आत घेण्याचा अधिकार आहे का ? लोकशाहीमध्ये मतदानाचा व उमेदवारीचा सर्वाना अधिकार आहे. 

अशा पद्धतीने यापूर्वी कधी ही घडले नाही. सर्वसामान्य जनतेच्या हक्कावर आपण गदा आणत आहात असा सवाल उपस्थित करीत प्रशासनास धारेवर धरले. 

कर्जत नगरपंचायत निवडणुकीत आमदाराच्या दबाव आणि दडपशाहीत भाजपाच्या फॉर्म काढल्याने संत श्री सदगुरु गोदड महाराज मंदिरासमोर न्याय हक्कासाठी मौन ठिया आंदोलन सुरू केले आहे. 

रात्रभर राम शिंदे यांच्या सुरु ठेवण्यात.आले होते. ही निवडणूक प्रक्रिया रद्द करून परत निवडणूक कार्यक्रम राबविण्यात यावा, अशी मागणी करण्यात आलेला आहे. .

या आंदोलनात जिल्हा बँकेच्या संचालक अंबादास पिसाळ, जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे, दादासाहेब सोनमाळी, अनिल गदादे, तारक सय्यद, गणेश क्षीरसागर, बापू शेळके, विशाल काकडे, सागर कांबळे, विनोद दळवी, आदी सहभागी झाले आहेत. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post