आगामी चार दिवसात थंडीचा कडाका...

मुंबई :  राज्यात कडाक्याच्या थंडीसाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. पुढच्या चार दिवसात रात्रीचे तापमान सरासरीखाली जाण्याचा अंदात वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे प्रत्येकाने खबरदारी घ्यावी, असे आवाहन केले जात आहे.


उत्तर भारतातील राज्यांत बहुतांश भागात थंडीच्या लाटेची स्थिती आहे. आता महाराष्ट्रात कडाक्याची थंडी पुढील दोन दिवसानंतर जाणवणार आहे. ढगाळ वातावरण निवळल्यानंतर उत्तरेकडून थंड वाऱ्यांचे प्रवाह सुरु झाला आहे. 

महाराष्ट्र राज्यात कडाक्याची थंडीसाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. येत्या चार दिवसांत रात्रीच्या किमान तापमानात तीन ते पाच अंश सेल्सिअसने घट होऊन ते सरासरीखाली जाण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

दरम्यान, मुंबईच्या कमाल तापमानात घट झालेली दिसून येत आहे. कुलाबा येथे 19.8 अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवले गेले. येथे सरासरीच्या तुलनेत एका अंशाने घट झालेली दिसून आली.

सांताक्रूझ येथे 9.6 अंश सेल्सिअस किमान तापमान होते. येथे सरासरीच्या तुलनेत दोन अंशांची वाढ झाली होती. दरम्यान, मुंबईचे तापमान घटले आहे. तसेच ठाणे आणि नवी मुंबईतही तापमानात घट पाहायला मिळत आहे. येथेही गारवा जाणवत आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post