मुंबई : पाच पैकी चार राज्यात भाजपने मुसंडी मारली त्यांनतर आता सगळ्यांच्या नजरा महाराष्ट्राकडे लागल्या आहेत. या निकालाचा राज्याचा राजकारणावर परिणाम होईल, अशी आशा भाजपच्या आमदारांना आहे. येणार्या काळात मुंबई महापालिका निवडणुकीतही भाजप बाजी मारेल असा विश्वास आशिष शेलार यांनी व्यक्त केला आहे.
पाच राज्यांत भाजपने जोरदार बाजी मारली. त्यानंतर आता महाराष्ट्रात सत्तांतर होणार का? याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. भाजपचे नेते जाहीरपणे महाराष्ट्र बाकी आहे, अशा घोषणा देत आहेत. त्यामुळे या चर्चांना बळ मिळत आहे. भाजपा नेत्यांनी ‘उत्तर प्रदेश झाँकी है, महाराष्ट्र अभी बाकी है’ असा घोषणा दिल्या.
महाराष्ट्रात सध्या तीन पक्षानी येत महाविकास आघाडी सरकार स्थापन केले आहे. पाचपैकी चार राज्यात जोरदार मुसंडी मारल्यामुळे महाराष्ट्रातील भाजप नेत्यांचाही आत्मविश्वास वाढणार आहे. पाच राज्यातील निकालामुळे महाविकास आघाडीतही अस्वस्थता निर्माण झाली आहे.
Post a Comment