विखे यांना धक्का... जिल्हा बँकेचे संचालक राळेभात राष्ट्रवादीत दाखल...

नगर : विखे गटाचे कट्टर समर्थक  जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात व मार्केट कमिटीचे माजी सभापती सुधीर राळेभात यांचा समर्थकांसह उपमुख्यमंत्री अजित पवार व आमदार रोहित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला.


जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात व त्यांचे बंधू कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुधीर राळेभात यांनी पुणे येथील साखर संकुल या ठिकाणी आज (ता. पाच)ला दुपारी उपमुख्यमंत्री अजित पवार व आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत हातात घड्याळ बांधले. 

या प्रवेशामुळे राष्ट्रवादीची ताकद जामखेडमध्ये वाढली आहे. याचा फायदा आता जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत होणार आहे. 

जिल्हा बँकेच्या निवडणुकीनंतर संचालक अमोल राळेभात यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर टीका करून बंड पुकारले होते. परंतु आता त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्याने राष्ट्रवादीची ताकद वाढली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post