एम. व्ही. देशमुख
नगर : कर्जत-जामखेड विधानसभा मतदार संघात सध्या राष्ट्रवादीमध्ये इनकमिंग सुरु झालेले आहे. या इनकमिंगमुळे या मतदार संघात राष्ट्रवादीची ताकद वाढत चालली आहे. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी याच वर्चष्मा राहिल, असे चित्र दिसून येत आहे. कर्जतमधील तो नेतेही लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
कर्जत-जामखेड मध्ये सध्या विकासाचा भागीरथ धावत आहे. ही सर्व किमया आमदार रोहित पवार यांनी करून दाखविली आहे. विकास कामे करून त्यांनी जनतेची मने कर्जत-जामखेड विधानसभा मतदार संघात जिंकली आहेत.
या विकास कामांमुळे आता विरोधकही राष्ट्रवादीत दाखल होण्यास सुरवात झाली आहे. कर्जतमधील माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर अनेकजणांनी प्रवेश केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीची एकहाती सत्ता कर्जत नगरपंचायतमध्ये आलेली आहे. त्या अगोदर प्रसाद ढोकरीकर राष्ट्रवादीत आलेले आहेत.
विखे गटाचे कट्टर समर्थक जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात व मार्केट कमिटीचे माजी सभापती सुधीर राळेभात यांचा समर्थकांसह उपमुख्यमंत्री अजित पवार व आमदार रोहित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. जामखेडमधील अनेकजण आता राष्ट्रवादीत येऊ लागलेले आहेत.
राळेभात हे जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या वेळीच राष्ट्रवादीत दाखल होणार होते.त्या वेळी राष्ट्रवादीने उमेदवार न देता त्यांना बिनविरोध निवडून दिले होते. त्यावेळी जे शक्य न झाल्याने ते आता राष्ट्रवादीत दाखल झाले आहेत.
आता कर्जत तालुक्यातील तो नेता ही राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु झालेली आहे. त्या निवडणुकीच्या वेळी तो नेता प्रवेश करणार होता. मात्र काही अडचणीमुळे हा प्रवेश झालेला नाही. परंतु हा प्रवेश जिल्हा परिषद निवडणुकीच्या अगोदर होणार असल्याची चर्चा कर्जत-जामखेड मतदार संघात सुरु आहे.
Post a Comment