महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेच्या जिल्हा सरचिटणीसपदी चंद्रकात तांदळे...

श्रीगोंदा :  जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय अहमदनगर येथील सभागृहात महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेचे त्रिवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडले. या वेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून  नारायण घुले पाटील, सचिन खराद, किरण जावळे यांनी कामकाज केले.


अहमदनगर जिल्हा कार्यकारिणी निवडणुक बिनविरोध करण्यात आली. यामध्ये राज्य कार्यकारिणी सदस्यपदी दत्तात्रय रोहकले, अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी सोमनाथ बाचकर, जिल्हा कार्याध्यक्ष पदी  जयवंत गदादे, जिल्हा सरचिटणीस पदी चंद्रकात तांदळे, सुवर्णा भोस यांची राज्य महिला प्रतिनिधी जिल्हा संघटकपदी सचिन खेतमाळस यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

 मागील आठवडय़ात कर्जत तालुक्यातील नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. कर्जत तालुका अध्यक्षपदीअनिल तोरकड, सचिव : रामदास भारती, उपाध्यक्ष  : अशोक आटोले,  गणेश शेंदूरकर,  प्रकाश नवले, उज्ज्वला शेळके, कार्याध्यक्ष:शिवाजी शेळके, खजिनदार : लक्ष्मण अनारसे, प्रसिद्धिप्रमुख : अभिमान मुरकुटे, तालुका संघटक राजेंद्र खामगळ, तालुका संघटक : दिपाली लगड, तालुका संघटक :नामदेव नवसरे.

मागील पाच वर्षापासून माजी तालुकाध्यक्ष चंद्रकांत तांदळे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत तालुक्यातील कृषी सहाय्यक यांचे साठी  12/24 वर्षाच्या लाभ, 10/20/30 वर्षे लाभ, कृषी सेवक कालावधी लाभ, इतर सर्व शासकीय मागन्या संदर्भात वेळोवेळो प्रशासकीय स्तरावर पाठपुरावा करून कृषी सहाय्यक यांचे साठी लाभ मिळून दिले.

शासकीय स्तरावर कार्य करून सामाजिक कार्यात देखील कर्जत तालुक्यातील कृषी सहाय्यक संघटनेचे योगदान दिले जसे की टाकळी खंडे. येथील अनाथाश्रमात एका महिन्यासाठी किराणा, चांदे बुद्रुक येथील बाल आश्रम येथे मदत निधी असेल, मयत कृषी सेवक कै. गडाख यांच्या साठी आर्थिक मदत, सहकारी कै. परहर यांचे कुटुंबासाठी आर्थिक मदत ,यासाठी कायमच कृषी सहाय्यक संघटना कर्मचारी हितासाठी अग्रस्थानी राहिले आहे.   

यावेळी कर्जत तालुक्यातील जयवंत गदादे, चंद्रकांत तांदळे, सचिन खेतमाळस, व श्रीमती सुवर्णा भोस यांना  जिल्ह्यातील महत्त्वाचे पदे  देण्यात आले. यावेळी सोमनाथ बाचकर व दत्तात्रय रोहकले यांनी  कर्जत तालुक्यातील सर्व पदाधिकारी यांचे सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा दिले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post