नगर ः दादापाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लिंबाच्या भावात वाढ झाली आहे. लिंबाला 10500 रुपयांचा क्विंटलचा भाव मिळाल्याने लिंबू उत्पादकांमध्ये समाधानाचे वातावरण होते. लिवासाठी अवघे 12 क्विंटल लिंबाची आवक झाली होती.
दादापाटील कृषी उत्पन्न बाजार समितीत रोज भाजीपाल्यांचे लिलाव होत असतात. त्यामध्ये लिंबाचेही लिलाव झालेल आहेत.
लिलावासाठी 12 क्विंटल 64 किलो लिंबाची आवक झाली. यामध्ये कमीत कमी अडीच हजार ते जास्तीत जास्त दहा हजार 50 रुपये क्विंटलचा भाव मिळाला.
सरासरी साडे हजार रुपये क्विंटल दराने लिंबाची विक्री झाली. मागणीच्या तुलनेत लिंबाची आवक कमी होती. त्यामुळे भाव चांगला मिळाला.
Post a Comment