क्रांतीसेनेच्या महिला तालुकाध्यक्षपदी भारतीताई म्हसे...

राहुरी : अखिल भारतीय क्रांतीसेनेच्या महिला आघाडीच्या राहुरी तालुकाध्यक्षपदी भारतीताई सुरेश म्हसे यांची नियुक्ती करण्यात आली. या निवडीचे पत्र क्रांतीसेनेचे प्रदेश संपर्क प्रमुख मधुकर म्हसे व पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष गोरक्षनाथ माळवदे यांच्या हस्ते देण्यात आले.


कोंढवड येथे क्रांतीसेनेची बैठक झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी शिलेगावचे लोकनियुक्त सरपंच डॉ. पांडुरंग म्हसे होते. या बैठकीत महिलांच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. 

यावेळी गोरक्षनाथ माळवदे व मधुकर म्हसे यांनी क्रांतीसेनेच्या माध्यमातून केलेल्या कार्याची माहिती देत महिलांचे विविध समस्या सोडविण्यासाठी डॉ. शालिनीताई पाटील यांनी स्थापन केलेल्या क्रांतीसेनेच्या माध्यमातून महिलांनी संघटित होऊन लढा उभारावा. 


यातुन पुढील काळात नक्कीच सर्वगुण संपन्न महिला नेतृत्व उदयास येईल. या निवडीचे अखिल भारतीय क्रांतीसेनेच्या मार्गदर्शिका माजी महसूलमंत्री शालिनीताई पाटील, पक्षप्रमुख संतोष तांबे, प्रदेश सरचिटणीस नितीन देशमुख, ॲड. विजयाताई भोगले पाटील आदींनी सौ. म्हसे यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

यावेळी शेतकरी आघाडीचे जिल्हाध्यक्ष गोरक्षनाथ म्हसे, राहुरी तालुकाध्यक्ष संदीप उंडे, सुरेशराव म्हसे, यशवंत म्हसे, राजेंद्र पेरणे, अनिल पिसाळ, जिवा पवार, शिवाजी म्हसे, सौ. सरिता म्हसे, संगिता म्हसे, अर्चना म्हसे, उषा माळवदे, राधिका म्हसे, मंगल म्हसे, उमा म्हसे, लता म्हसे, लक्ष्मी म्हसे, वर्षा म्हसे, रंजना म्हसे, शोभा म्हसे, शोभा पाले, सविता पवार, रूपाली म्हसे, पुजा म्हसे, इंदुबाई म्हसे आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post