मतदारांच्या विश्वासाच्या जोरावर विकास कामांची घौडदौड... विश्वास सार्थ ठरविला... जिल्हा परिषद सदस्य उज्ज्वलाताई ठुबे यांची माहिती...

अमर छत्तीसे


पारनेर : कान्हूर पठार जिल्हा परिषद गटात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून उभा राहिलेला विकासकामांचा डोंगर हा मतदारांनी ठुबे कुटुंबियांवर वर्षानुवर्षे दाखविलेल्या विश्वासाचे प्रतिक आहे. या विश्वासाच्या जोरावरच या गटातील विकासकामांची घोडदौड अबाधित राखण्यात आपणास यश मिळालेले आहे. 

निवडणुकीपुरत राजकारण व राहिलेल्या वेळेत अखंड समाजकारण या माजी आमदार कै. कॉम्रेड बाबासाहेब ठुबे व पारनेरच्या राजकारणात जनसामान्यांचे नेतृत्व करत असलेले जिल्हा परिषद माजी सदस्य ॲड.आझाद ठुबे यांनी सातत्याने जोपासलेल्या विचारधारेचे अनुकरण केल्यानेच निवडणुक कालावधीतील वैचारिक संघर्ष दुर्लक्षित करुन गटाचा सर्वांगिण विकास करण्यात तालुक्यात अव्वलस्थान प्राप्त झाल्याचे समाधान स्थानिक नागरीक व्यक्त करत असल्याचे कान्हूर पठार जिल्हा परिषद गटाच्या विद्यमान सदस्य उज्वलाताई आझाद ठुबे यांनी सांगितले.

ठुबे म्हणाल्या की, ठुबे कुटुंबाला माजी आमदार कै. बाबासाहेब ठुबे यांच्या विचारांचा राजकीय वारसा असला तरी एक महीला प्रतिनिधी म्हणून मला हे क्षेत्र नवीन होते. परंतु जिल्हा परिषदेचे माजी सदस्य ॲड. आझाद ठुबे यांच्या सहकार्याने जिल्हा परिषदेच्या कामकाजाची पद्धत समजून घेत सामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवून विकासकामांची यशस्वी प्रक्रिया राबवली. 


भौगोलिक व त्याअनुषंगाने सामाजिकदृष्ट्या विविधता असलेल्या गटातील प्रत्येक गावात स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊन शिक्षण, रस्ते, जलसंधारणासोबतच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्याने सुरुवात करत बहुतेक प्रश्न मार्गी लावले.

गटातील प्रत्येक गावात उभ्या असलेल्या जिल्हा परीषद व अंगणवाडीच्या भव्य व सुसज्ज इमारती या ठुबे कुटुंबाच्या कर्तुत्वाची झलक अवघ्या महाराष्ट्राला दाखवत आहे. त्यानिमित्ताने शिक्षणाची गंगा सर्वसामान्यांच्या दारात थोपविण्याचे भाग्य लाभल्याचे आत्मिक समाधान मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले.

ठुबे कुटुंब व सामान्य नागरीक यांच्या नात्यांची वीण इतकी घट्ट आहे की, कोरोना हा विषाणूजन्य आजार अवघ्या जगात थैमान घालत असताना कान्हुरपठार या गावात आझाद ठुबे मित्र मंडळाच्या माध्यमातून कै.कॉम्रेड बाबासाहेब ठुबे कोविड केअर सेंटर चालवत गटातील नागरीकांसोबतच तालुका व तालुक्याबाहेरील सातशेहुन अधिक नागरीकांवर मोफत उपचार करत सर्वसामान्यांच्या व्यथेचं प्रदर्शन न मांडता दिलासा दिला.

सर्वसामान्यांच्या हक्कांसाठी मोर्चे, चळवळ, आंदोलन हा ठुबे कुटूंबियांच्या राजकारणाचा गाभाच असल्याने वेळोवेळी प्रशासनातील मग्रुर व कामचुकार अधिकारी व पदाधिका-यांना वठणीवर आणण्यासाठी आझाद ठुबेंच्या नेतृत्वाखाली पारनेर पंचायत समितीच्या तत्कालीन सभापती व बिडीओंच्या विरोधात काढलेल्या टिकुरे मोर्चासारखे विविध मोर्चे, आंदोलन करत सर्वसामान्य नागरीकांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केला व यापुढेही त्यात कसुर होणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

मागिल पाच वर्षांत गटातील बहुतेक गावांत विविध विकासकामांसाठी एक कोटीहुन अधिक निधी देण्यात आला आहे. 

सामान्य माणसांच्या चेह-यावरील अलौकीक समाधान हीच आपल्या कामाची पावती असल्याचे सांगताना इतर राजकीय नेतृत्वांसारखी पहीली फळी, दुसरी फळी मग सामान्य जनता अशी कार्यकर्त्यांची किंवा मतदारांची वर्गवारी ठुबे कुटुंबाने कधीही जोपासली नसुन डायरेक्ट जनसामान्यांशी जोडली गेलेली विकासात्मकतेच्या निकषांवर आधारलेली वैचारीक नाळ जपण्यात आपण यशस्वी ठरल्याचा आनंद होत असल्याचे उज्वला ठुबे यांनी सांगितले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post