पारनेर-नगरमधील पाझर तलावांच्या दुरुस्तीसाठी साडेसहा कोटीचा निधी....

पारनेर : पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघातील ३४ पाझर तलाव दुरुस्ती साठी सहा कोटी ६६ लाख ९५ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार निलेश लंके यांनी दिली आहे.


लंके म्हणाले की, पारनेर तालुक्यातील २१ पाझर तलाव दुरुस्तीसाठी ३ कोटी ७९ लाख ३९ हजार रुपये तर नगर तालुक्यातील १३ गावांसाठी २ कोटी ७७ लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. या अगोदर पण या मतदारसंघातील १२७ पाझर तलाव दुरुस्ती साठी २७ कोटी रुपयांच्या वर निधी गेल्या मागील काही महिन्यांपूर्वी मंजूर झाला आहे. 

गेल्या अनेक वर्षापासून पाझर तलाव दुरुस्तीसाठी निधी मिळावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आमदार निलेश लंके यांनी वेळोवेळी लेखी व तोंडी पाठपुरावा केला होता. त्या पाठपुराव्याला यश आले आहे. पाझर तलाव दुरुस्तीसाठी ऐतिहासिक निधी मिळाला असल्याचा दावा आमदार निलेश लंके यांनी केला आहे.

यामध्ये प्रामुख्याने कान्हूर पठार येथील २ पाझर तलावासाठी २१ लाख ४० हजार, गांजीभोयरे येथील खोडदे मळा १२ लाख ८५ हजार, अक्कलवाडी गावठाण नंबर १ ९लाख ८१ हजार, दैठणे गुंजाळ येथील विहिरी जवळचा ९ लाख ४१ हजार, रायतळी येथील हनुमान मंदिर जवळचा ४ लाख २९ हजार, दरोडी येथील मुजावर वस्ती ३ लाख ४२ हजार, मावळेवाडी येथील भोसले वस्तीवर ८ लाख ४२ हजार, रांजणगाव मशीद येथील पाझर तलाव क्रमांक १ ४० लाख ३० हजार, वाळवाणे पाझर तलाव ३९ लाख २५ हजार, सुपा पवार वस्ती पाझर तलाव ३३ लाख २५ हजार, अस्तगाव तरवडी पाझर तलाव ३३ लाख दोन हजार, रायतळे बेंदनाला पाझर तलाव १९ लाख ४६ हजार, गटेवाडी बेल ओढा पाझर तलाव २८ लाख ४ हजार, वाघुंडे बुद्रुक दिवटे वस्ती ७ लाख ८४ हजार, वडनेर हवेली माऊली बाबा १७ लाख ७९ हजार, वाडेगव्हाण सोनवणे वस्ती १० लाख १९ हजार, हंगा बुवासाहेब दरा २३ लाख ७९ हजार, अपधूप यांची पाझर तलाव ८ लाख ३२ हजार, अपधूप सरोवर पाझर तलाव १० लाख ४४  हजार असा पारनेर तालुक्यातील २१ बंधाऱ्यांसाठी ३ कोटी ७९ लाख ३९ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

नगर तालुक्यातील देऊळगाव सिद्धी महादेव नाला २४ लाख ३९ हजार, सारोळा कासार माळीमळा २३ लाख २३ हजार, सारोळा कासार गावठाण ११ लाख १३ हजार, निमगाव घाणा ३२ लाख २७ हजार, निमगाव गाना ३२ लाख ९७ हजार,  देहरे बाभळ टोक ४५ लाख ४१ हजार, शिंगवे पाझर तलाव दुरुस्ती ३६ लाख ४९ हजार, निमगाव घाणा कोल्टेहेक १२ लाख ९६ हजार, देहरे करंडे वस्ती ५ लाख १६ हजार, नांदगाव जाधव मोरेवस्ती ११ लाख ९६ हजार, खारे कर्जुने खोलदरी ४ लाख २६ हजार, हिवरेबाजार लिंबाचा मळा ८ लाख २४ हजार, हिवरेबाजार पाझर तलाव क्रमांक १ साठी २९ लाख ६९ हजार असा एकूण १३ गावातील पाझर तलाव दुरुस्ती साठी २ कोटी ७७ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती आमदार निलेश लंके यांनी दिली आहे.

पारनेर तालुक्यात १९७२ मध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने केंद्र व राज्य सरकारने सर्वाधिक पाझरतलाव पारनेर तालुक्यात बांधली होते. या तलावांची उभारणी केल्यापासून अद्यापपर्यंत त्यांच्यावर एक रुपयाही खर्च केला नव्हता. त्यामुळे या पाझर तलावातुन मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती होत होती. गेल्या महिन्यात पारनेर तालुक्यातील ६९ पाझर तलावासाठी जवळपास दोन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. 

या महिन्यात पारनेर नगर मतदारसंघातील ३४ पाझर तलाव दुरुस्तीसाठी ६ कोटी ६६ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार निलेश लंके यांनी दिली आहे. त्यामुळे या पाझर तलावातुन पाणीगळती थांबणार असून सिंचन क्षेत्रात मोठी वाढ होणार असल्याचे अशा आमदार लंके यांनी व्यक्त केली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post