नगर : भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश संघटनेची पारनेर तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली. संघटनेच्या पारनेर तालुकाध्यक्षपदी उमेश गायकवाड तर महिला तालुकाध्यक्षपदी सारिका लांडगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पारनेर येथील शासकीय विश्रामगृहावर संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष रघुनाथ आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक पार पडली.
यावेळी जिल्हा संघटक भानुदास साळवे, सुनिल म्हस्के, मनोज कोकाटे, भाऊसाहेब खेडेकर, अजित शेख, मनोज गायकवाड, अर्चना बोडरे, सुशिला चव्हाण, अनिता देवकर, पुष्पा भालेकर आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
रघुनाथ आंबेडकर म्हणाले की, जिल्ह्यात शासकीय व निमशासकीय कार्यालयात सर्वसामान्यांची कामे चिरीमिरी घेतल्याशिवाय केली जात नाही. मोठ्या प्रमाणात अनागोंदी व भ्रष्टाचार वाढलेला आहे.
संघटनेच्या माध्यमातून भ्रष्टाचाराला लगाम लावण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून कार्य सुरु आहे. नवीन पदाधिकार्यांनी सर्वसामान्यांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी कार्य करण्याचे आवाहन केले.
तसेच संघटनेच्या पारनेर तालुका उपाध्यक्षपदी सुनील म्हस्के, शहराध्यक्षपदी मनोज कोकाटे यांच्यासह इतर पदाधिकारी व सदस्यांची नियुक्त्या करुन, जुन्या पदाधिकार्यांच्याही फेरनियुक्त्या करण्यात आल्या.
भानुदास साळवे यांच्या हस्ते नूतन पदाधिकार्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब कांबळे यांनी सर्व पदाधिकार्यांचे अभिनंदन करुन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
नूतन पदाधिकार्यांनी सर्वसामान्यांना त्यांची हक्क मिळवून देण्यासाठी कटिबध्द राहणार असून, त्यांच्यावर होत असलेला अन्याय दूर होण्यासाठी जनजागृती देखील केली जाणार असल्याचे स्पष्ट केले.
Post a Comment