पुणे : पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीचे आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार दौंड तालुक्यात घडला आहे. पत्नीसह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दौंड तालुक्यातील बोरीपार्धी गावात ही घटना घडली आहे.
पत्नीने व तिच्या घरच्यांनी पहिले लग्न झाल्याचे लपवले तसेच पैशाची मागणी करत त्रास दिल्याने पतीने विषारी औषध प्राशन केले. प्रशांत शेळके असे आत्महत्या केलेल्या व्यक्तिचे नाव आहे.
प्रशांत शेळके याचे भाग्यश्री पिसे हिच्याशी लग्न झाले होते. मात्र भाग्यश्री हिने पहिले लग्न झालेचे लपवून ठेवून प्रशांत बरोबर दुसरे लग्न केले. तसेच त्यास वेळोवेळी पैशाची मागणी करून त्रास दिला. या त्रासाला कंटाळून प्रशांतनं त्याच्या मोबाईलवरती औषध पित असतानाचा व्हिडीओ तयार केला.
14 फेब्रुवारी 2022 रोजी बोरीपार्धी गावचे हद्दीतील बोरमलनाथ मंदीराचे परिसरात त्याने औषध घेतले. औषध प्राशन केल्याने प्रशांत यास पुणे येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
मात्र त्याचा रविवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. 14 दिवस त्याने मृत्यूशी झुंज दिली. प्रशांत याचे वडील संपत विठ्ठल शेळके यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानेपत्नी भाग्यश्री पिसे, सासू स्वाती दत्तात्रय पिसे, सासरे दत्तात्रय विठ्ठल पिसे, प्रदीप भिवा नेवसे यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Post a Comment