राज्यात आगामी चार दिवस पावसाचे...

मुंबई : राज्याच्या अनेक भागात सध्या रब्बी हंगामातील गहू, हरभरा व अन्य पिकांची सोंगणी सुरू आहे. त्यात पुन्हा भारतीय हवामान विभाग पुणे आणि हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी आठ ते अकरा मार्चदरम्यान उत्तर-मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि कोकणपट्टी या भागात पावसाची शक्यता वर्तवली आहे. 


राज्यात अनेक भागात सध्या गहू, हरभरा पिकाची काढणी सुरू आहे. ही काढणी 7 मार्चपर्यत पूर्ण करावी, डख यांचे म्हणणे आहे. राज्यात शनिवारपासून ढगाळ वातावरण तयार झाले असून यामुळे रिमझिम पाउस पडत राहील. आठ ते अकरा मार्चपर्यंत ढगाळ वातावरण राहून उत्तर व मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि कोकणपट्टी या चार भागात जास्त पाऊस राहिल.

उर्वरीत भागात तुरळक पडण्याचा अंदाज डख यांचा आहे. यासह 7 ते 11 मार्चदरम्यान देशात तामीळनाडू, केरळ, कर्नाटक आध्रंप्रदेश या राज्यात जोरदार पाउस पडणार असल्याचे डख यांनी स्पष्ट केले आहे.

आयएमडी पुणे यांनी देखील राज्यात 7 तारखेला कोकण आणि गोव्यात तुरळक ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात, विदर्भ आणि मराठावाड्यात तुरळक ठिकाणी पावसासह काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटात सोसायट्याच्या वार्‍यासह पावसाची शक्यता आहे. 

हीच परिस्थिती पुढे 8 आणि 9 मार्चलाआहे होणार असल्याचे अंदाज पुणे आयएमडीने वर्तावला आहे. दरम्यान, 7 ते 9 मार्चला राज्यातील विविध भागात पावसाची शक्यता आयएमडी पुणे यांनी तर 8 ते 11 मार्च दरम्यान पावसाची शक्यता मराठवाड्यातील हवामान अभ्यासक डख यांनी वर्तवली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post