छळाला कंटाळून शिक्षकाची आत्महत्या....

बीड : महाविद्यालयातील सहकारी प्राध्यापकाच्या जाचाला कंटाळून शिक्षकानं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. घटना बीडच्या पालवन चौक परिसरात घडली आहे. 


राहुल ईश्वर वाघमारे असे मयत शिक्षकाचे नाव आहे. ते शहरातील प्रियदर्शनी माध्यमिक विद्यालयात शिक्षक होते. आत्महत्या करण्यापूर्वी ईश्वर वाघमारे यांनी सुसाईड नोट लिहून ठेवली आहे.

सुसाईड नोट मध्ये दोन जणांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.  शिवाजीनगर पोलीस घटनास्थळी पोहचले असून सुसाईड नोट ताब्यात घेतली आहे. पुढील तपास शिवाजी नगर पोलीस करीत आहेत. सहकारी प्राध्यापकाच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्यानं शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post