क्लास घेणारा एक अन् नोंदणीसाठी एजंट... एजंटगिरीच्या कामामुळे घरात वादंग ...

नगर : उन्हाळा सुरु झाल्यानंतर मुलांसह मोठ्यांसाठी वेगवेगळे संस्कार वर्ग भरविले जातात. सध्या एका वर्गाची चांगलीच चर्चा सुरू असून कमिशनवर काहींना नियुक्त केल्याची चर्चा आहे. उन्हाळा सुरु झाल्यानंतर अनेक प्रकारचे प्रशिक्षण, संस्कार वर्ग, डान्स क्लास आदीचे आयोजन केले जात आहे.  


हे क्लास आयोजित करताना आयोजक स्वत:चे नंबर देऊन स्पर्धा व क्लासचे नियोजन करीत आहेत. मात्र सध्या जिल्ह्यातील एका क्लासने चक्क महिला व मुलींसाठी प्रशिक्षण आयोजित केलेले आहे. प्रशिक्षण चालू महिन्यातील तिसरंया आठवड्यात होणार आहे. 

या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन संबंधिताने केले आहे. हे करताना  स्वत:चा नंबर देण्याऐवजी कमिशनवर काही महिलांची नियुक्ती केलेल्यांची नावे व नंबर दिलेले आहे. त्यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे. 

विशेष त्या व्यक्तीने त्याच्या कुटुंबातील महिला सदस्यांचा नंबर देणे क्रमप्राप्त होते. मात्र त्याने त्यांच्या कुटुंबियातील महिलांचा नंबर न देता इतरांचा दिलेला आहे. त्यामुळे त्या क्लास विषयी संशय व्यक्त केला जात आहे. 

त्यामुळे प्रत्येकाने कोणत्याही स्पर्धेत सहभागी होताना काळजी घेणे गरजेचे आहे. नाही तर फसगत होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

या एजंटगिरीच्या प्रकरणामुळे काहींच्या घरात चांगलेच वाद निर्माण झालेले असून घरातील कामे सोडून बाहेर पैसे कमिवण्याचा त्यांचा प्रयत्न कुटुंबियांना त्रासदायक ठरत आहे. तासन् तास त्या एजंटगिरीचे कामाचे फोन सुरु राहत असल्याने त्या एजंटाच्या घरात चांगलाच झिंबा होत आहे. 

असाच मागेही काहींनी उद्योग केला होता. तेव्हाही काहींनी त्या व्हॉटसअँप ग्रुपवर जॉईन केले होते. त्यावेळीही चांगलेच वादंग झालेले होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post