आमदार निलेश लंके यांनी दाखवीला हिरवा कंदील...

पारनेर : पारनेर नगरपंचायतीच्या वतीने आयोजित घनकचरा संकलन व व्यवस्थापन कार्यक्रमाचे उदघाटन समारंभ आमदार निलेश लंके यांच्या हस्ते कपण्यात आले.


यावेळी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडर, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून पारनेर चौकातील दर्ग्याचा उरुस आसल्या कारणाने दर्ग्याला चादर चढवून व रोकडेश्वर मारुती मंदीरात पुष्पहार अर्पण करून सर्व सफाई कामगार व घंटा गाडीसह नगरपंचायतच्या नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष सह सर्व नगरसेवक कर्मचारी यांच्या उपस्थितीत पारनेर शहरातुन फेरी काढण्यात आली .

पारनेर शहराचे ग्रामदैवत असनारे काळ भैरवनाथ व नागेश्वर मंदिरात पुष्पहार अर्पण करत सेनापती बापट स्मारकात कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. आली.

या वेळी नगराध्यक्ष विजय औटी,उपनगराध्यक्ष  सुरेखा  भालेकर,आरोग्य समिती सभापती डॉ.विद्या  कावरे, बांधकाम सभापती नितीन अडसूळ, पाणीपुरवठा विभाग सभापती योगेश मते, नगरसेवक हिमानीताई नगरे, सुभाष शिंदे, अशोक चेडे, विजय भास्कर औटी, डॉ. सचिन औटी, भूषण शेलार, श्रीकांत चौरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन भालेकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे डॉ. सेल जिल्हा अध्यक्ष डॉ. बाळासाहेब कावरे, मुद्दसर सय्यद, विजय डोळ, बाळासाहेब नगरे, बाळासाहेब मते, बबन चौरे, लतीफ राजे , दिपक नाईक, प्रशांत शेरकर , वैभव बढवे, प्रकाश घोडके , भाऊसाहेब फंड , दिपक नाईक , प्रविन औटी, अॅड. गणेश कावरे , उमाताई बोरुडे , चंदन भळगट , वैभव गायकवाड तसेच पारनेर शहरातील सामाजिक राजकीय क्षेत्रात काम करत असलेले अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

गेल्या अनेक वर्षापासून शहरात स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर असताना पारनेर नगरपंचायतच्या माध्यमातून स्वच्छतेचा व आरोग्याचा कुठलेही विधायक काम झाले नाही. आमदार निलेशजी लंके यांच्या राष्ट्रवादीच्या ताब्यात नगरपंचायत गेल्यानंतर प्राधान्याने आरोग्य व स्वच्छतेचा प्रश्न राबवावा असा आदेश आमदार निलेश लंके यांनी दिला. तात्काळ कारवाई करत शनिवारी पाडव्याचे औचित्य साधत सर्व सफाई कामगार व नगरपंचायतच्या अधिकारी कर्मचारी व सर्व नगरसेवक यांच्या मदतीने स्वच्छ सुंदर व देखणे पारनेर बनवण्याचा उद्देश ठेवून ही स्वच्छता मोहीम सुरू केली  आहे. संबंधित ठेकेदाराला एक महिन्याच्या आत पारनेर शहराचा चेहरामोहरा बदलण्याचा शब्द आमदार साहेबांनी घेतला व नगराध्यक्ष म्हणून थोड्याच दिवसात पारनेर शहर स्वच्छ शहर म्हणून नावारूपाला येईल असा मला विश्वास आहे. -विजय सदाशिव औटी, नगराध्यक्ष नगरपंचायत, पारनेर


 

आरोग्याचा विषय स्वच्छते वर अवलंबून असतो त्यामुळे आमदार निलेश लंके यांच्या संकल्पनेतील पारनेर शहर स्वच्छ व सुंदर शहर असावा . कुठलीही रोगराई या पारनेर शहराला स्पर्श करू शकणार नाही तेव्हा पारनेर शहर हे राज्यात स्वच्छता सर्वेक्षणात अग्रभागी शहर असणार हे ध्येय ठेवून पारनेर शहराचा चेहरा-मोहरा बदलण्याचा मानस ठेवून स्वच्छता अभियाना अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन व संकलन या मोहिमे अंतर्गत सुरू झालेले या अभियानास पारनेर शहरवासीयांनी उस्फुर्त असा प्रतिसाद दिला . याच प्रकारे यापुढील काळातही पारनेर शहर हे राज्यात आनोखे शहर बनवण्यासाठी आम्हाला सहकार्य करावे. - डॉ. विद्या बाळासाहेब कावरे,  सभापती, आरोग्य समिती नगरपंचायत, पारनेर

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post