व्यावसायिकाचा बंगला फोडला...

निघोज : निघोज परिसरातील कुंड रस्त्यानजीक मुंबई येथील व्यवसायीक व सामाजिक कार्यकर्ते राजूशेठ रामचंद्र वराळ यांच्या बंगल्यातील चोरीचा तपास करण्यासाठी सहा दिवसानंतर पोलिस सतर्क झाले आहे.


रविवार दि.१८ रोजी निघोज येथील हेडकॉन्स्टेबल डहाळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी वराळ यांच्या बंगल्यावर जाउन चर्चा करीत चोरट्यांना पकडण्यासाठी कोनत्या प्रकारची यंत्रणा कामाला लावल्याची माहिती वराळ यांना देण्यात आली आहे. 

याबाबत संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ यांनीही या चोरीचा तपास करण्यासाठी पोलीसांकडे मागणी केली होती. वराळ यांचा बंगल्यावर गच्चीवर जाऊन तसेच पुन्हा खाली उतरून आतील दरवाजे तोडून दोन टी व्ही संच तसेच देवघरातील पितळी मूर्ती चोरुन नेल्या आहेत.

तसेच त्यांची शेती करणारा महारुद्र ताठे यांच्या बंगल्यापाठीमागे असणाऱ्या खोलीचा दरवाजा तोडून पाच हजार रुपयांची चोरी केली आहे. वराळ यांचा दिड लाख रुपयांचा ऐवज चोरीस गेला आहे. वराळ यांचे कुटुंबीय मुंबईत आहे.तसेच वराळ हे कामानिमित्त बाहेरगावी होते. ताठे हे त्यांच्या गावी होते.बंगला बंद असल्याची संधी साधून चोरट्यांनी बंगला साफ करण्याचा प्रयत्न केला.

याचा अर्थ चोरटे हे परिसरातील असल्याची शक्यता असल्याने पोलिसांना चोरीचा तपास करणे सोपे जाणार आहे. मात्र गावची लोकवस्ती मोठी त्यातही निघोज पोलिस दूरक्षेत्र अंतर्गत गावांची संख्या वीस ते पंचवीस आहे. यासाठी फक्त तीन पोलिस कर्मचारी उपलब्ध असल्याने पारनेरचे कामकाज पहायचे की परिसराचे हा पोलीसांना मोठ्या प्रमाणात कामाचा ताण आहे.म्हणून पोलीस तपासात दिरंगाई होत आहे. 

काम जास्त व पोलिस कर्मचारी संख्या कमी असा प्रश्न निघोज पोलिस दूरक्षेत्रला सातत्याने भेडसावत असल्याने निघोजला पोलीस चौकी देण्यात यावी अशी मागणी लवकरच राज्याचे महसूलमंत्री यांच्या माध्यमातून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात येणार आहे. 

फडणवीस यांच्याकडे गृहखाते असल्याने या मागणीचा पाठपुरावा करण्यात येणार असल्याची माहिती संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ यांनी बोलताना दिली आहे.

निघोज व परिसरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून त्याला पायबंद बसण्यासाठी ग्रामसुरक्षा दलाची कार्यवाही करण्याची गरज आहे. तसेच ज्यांची चोरी झाली त्यांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधून फिर्याद देण्याची गरज असून यामुळे पोलिस सतर्क राहतील, असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post