अमर छत्तीसे
श्रीगोंदा : आढळगाव जिल्हा परिषद गटातुन उमेदवारी करण्यासाठी इच्छुक असणारे रोहिदास पवार यांनी भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांची भेट घेतल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील राजकारण नेहमीच चर्चेत असते आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकिला अवधी असतांना देखील काही राजकीय मंडळी आतापासूनच पक्षातील वरिष्ठांकडे फिल्डिंग लावताना दिसत आहे. कोणी खासदार विखे गटाकडे तर कोणी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे फिल्डिंग लावताना दिसत आहे.
अशाच प्रकारे पेडगावचे माजी सरपंच व विद्यमान चेअरमन रोहिदास पवार यांनी आपल्या सहकार्यांसह भाजपचे जेष्ठ नेते माधव भंडारी यांची भेट घेतली आहे.
या भेटी वेळी बाजार समितीचे माजी सभापती उत्तम आधोरे, नगरसेवक संतोष क्षीरसागर, गणेश मैंद, शिर्के, जंजीरे आदी उपस्थित होते. या भेटी वेळी राजकिय चर्चा झाली असून तालुक्यात विशेषतः आढळगाव जिल्हा परिषद गटात चर्चेला उधाण आले आहे.
रोहिदास पवारांनी आढळगाव गटात जनसंपर्क हि वाढवला असून अनेक ठिकाणी स्वखर्चाने रस्ते केले आहेत.
Post a Comment