गुरुजींची प्रतिमा मलीन

नगर : जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु झालेली आहे. या रणधुमाळी सर्व मंडळांचे नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत आहे. यामुळे शिक्षकांची प्रतिमा मलीन होत आहे.


जिल्हा प्राथमिक बँकेसाठी 16 ऑक्टोबरला मतदान होत आहे. त्यामुळे शिक्षक संघटनांसह मंडळांनी प्रचाराचा जोर धरला आहे. या प्रचारात सध्या आरोप प्रत्यारोप सुरु झालेले आहेत. 

निवडणुकीच्या प्रचारासाठी जिल्ह्यातील काही प्राथमिक शिक्षकांनी रितसर रजा टाकलेली आहे. तर काहीजण विना रजाच प्रचार करीत फिरत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याकडे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे दुर्लक्ष झाल्याने शिक्षकांच्या प्रतिक्षेत शाळा असल्याचे दिसून येत आहे.

निवडणुकीच्या निमित्ताने सध्या प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. प्रत्येक पँनल प्रमुख आपला पँनल किती स्वच्छ कारभार करणार असून किती कार्यक्षम माणसे निवडणुकीत उतरवले आहे हे पटवून देत आहे. मात्र हे करताना इतर मंडळाचे नेते व कार्यकर्ते व उमेदवार यांच्यावर खालच्या पातळीत टिका केली जात आहे. या टिकेमुळे शिक्षकांची प्रतिमा मलीन होत आहे. आपली सत्ता येण्यासाठी गुरुजीगुरुजींची बेअब्रु करीत असल्याने सर्वसामान्य शिक्षकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. यामुळे जिल्हा परिषदेची प्रतिमा मलीन होत आहे. त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाने शिस्त भंगाची कारवाई अशा षिक्षकांवर करावी, अशी मागणी होत आहे.

शिक्षण विभागाने शाळांना अचानक भेटी देईन शाळेत किती शिक्षक उपस्थित राहत आहेत, याची पडताळणी करणे गरजेचे आहे, असे मत आता पालकांमधून व्यक्त केले जात आहे.

दिवाळीची सुट्टी अगोदर सहामाही परीक्षा होत असते. या परीक्षेची तयारी शिक्षकांनी आता करणे गरजेचे.आहे. मात्र अनेक शाळेतील शिक्षक सध्या मंडळांच्या प्रचाराचे नियोजन करण्यात व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे बँकेची निवडणूक पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी पालकांमधून व्यक्त होत आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post