निघोज : येथील आपल गाव गणपती गणेश मित्र मंडळाच्या वतीने कोजागिरी पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
सरपंच चित्राताई वराळ पाटील, ग्रामपंचायत सदस्या शबनूर इनामदार, ग्रामपंचायत सदस्या रुपालीताई गायखे यांच्या हस्ते दांडिया रास व कोजागिरी पौर्णिमा उत्सवाचे उद्घाटन करीत कोजागिरी पौर्णिमा या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी पारनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष सोमनाथ वरखडे, पारनेर तालुका पत्रकार संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक दत्ता उनवणे, संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे सचिव ठकाराम गायखे, मंळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे विश्वस्त बबनराव ससाणे, मार्गदर्शक भास्करराव सोनवणे, कन्हैया ज्वेलर्सचे संचालक सुदर्शन निघोजकर, किरण चव्हाण, कचरु गायकवाड, अल्पसंख्याक समाजाचे नेते अस्लमभाई इनामदार, युवा नेते रुपेश ढवण, आप्पासाहेब वराळ, मेडिकल संघटनेचे पदाधिकारी संदीप वराळ, बाळासाहेब साळवे, मंडळाच्या मार्गदर्शीका लता पठारे,श्रीमती साळवे, श्रीमती पोपळघट, श्रीमती शिर्के, श्रीमती ईधाटे, श्रीमती सोनवणे, श्रीमती गायकवाड,श्रीमती रणसिंग, मंडळाचे अध्यक्ष - रवी रणसिंग,उपाध्यक्ष - नागेश अनंत,सचिव - रोहित पठारे, कार्याध्यक्ष - महेश ठाणगे, खजिनदार - दिपक साबळे, मंडळाचे सभासद शुभम शेवाळे, माऊली मूळे, संदिप साबळे, सचिन शिरवले, गणेश हरेल,चंदा उचाळे, अशोक वैरागर, मच्छिन्द्र गुंड, रिकी सोनवणे, आशिष सुरकुंडे, नामदेव पढेकर, संकेत लाळगे, विशाल जाधव, तेजस वाघचौरे, प्रज्वल भालेकर, अतुलशेठ वरखडे, मंगेश सोनवणे, अनिल निकाळजे, अविशेठ निचीत, भावेश इंगळे, राजेश पंढरपूरे, गणेश भागवत आदी महिला भगीनी व युवती तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ग्रामपंचायत सदस्या रुपालीताई गायखे, व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी आप्पासाहेब वराळ, मंडळाचे सदस्य प्रज्वल भालेकर, आदित्य नरवडे यांचा वाढदिवस साजरा करुन त्यांचा मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी दांडिया रासमध्ये शेकडो महिला,युवती तसेच युवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी साधारण रात्री ११ च्या दरम्यान सर्व उपस्थीतांना मंडळाच्या वतीने दूधाचे वाटप करण्यात आले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष रवि रणसिंग यांनी गणेश उत्सव व ईतर उस्तव साजरे करण्याचा उद्देश सांगितला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश ठाणगे, रोहित पठारे यांनी केले. प्रज्वल भालेकर, शुभम शेवाळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Post a Comment