कर्जत ः केवळ आपली सत्ता आली आणि त्यातून आपल्या विरोधकावर कारवाई करायची हा त्यांचा हेतू आहे. सरकार आल्यामुळे सध्या ते हवेत गेल्यासारखं वागतात' असा टोला रोहित पवार यांनी लगावला.
पवार म्हणाले की, कारखाने पंधरा दिवस उशिरा सुरू होणार आहेत. त्यामुळे हंगामही लांबणार आहे. गेल्यावर्षी अनेक शेतकऱ्यांचा ऊस उभा होता. उन्हाळ्यात ऊस तोडावा लागला. शेतकऱ्यांचेही नुकसान झाले. माझ्या विरोधकांना केवळ विरोध करणं माहित आहे.
विकासाबद्दल त्याना काहीही घेणंदेणं नाही. माझ्यावर कारवाईबाबत त्यांनी राजकीय दृष्टीकोनातून भलंमोठं पत्र लिहिलं. त्याचवेळी त्यांनी अतिवृष्टी आणि शेतकऱ्यांच्या समस्यांबाबतही सरकारला पत्र लिहले असते तर मान्य केलं असतं' अशी टीकाही रोहित पवार यांनी केली.
रोहित पवार यांनी राम शिंदे यांच्यावर टीका केली आहे. त्यामुळे आता त्या टीकेला राम शिंदे काय उत्तर देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment