मध्यावधी निवडणुका लागणार....

मुंबई : राज्यात लवकरच मध्यावधी निवडणुका लागणार असून कामाला लागा, असे आदेशशिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिले आहे.


उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभा संपर्कप्रमुखांची बैठक बोलावली होती. या बैठकीदरम्यान उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना मोठा दावा केला आहे. कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याचे आदेश दिले आहे.

मागील 3 महिन्यांचा आढावा घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी बैठक बोलावली होती. गुजरात निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रातील 4 मोठे प्रकल्प हे गुजरातला गेले आहे. राज्यातील लोकांना विश्वास देण्यासाठी मोदी यांनी दोन पॅकेजची घोषणा केली आहे. 

राज्यात मध्यावधी निवडणूक लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते कामाला लागले पाहिजे, सर्वांनी तयारीला लागावे, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले आहे, अशी माहिती शिवसेनेच्या नेत्या मनीषा कायंदे यांनी दिली.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post