पवार यांना टीका करण्याचा अधिकार नाही.....

नगर : शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी संपूर्ण राजकीय कारकिर्दीत अनेक तडजोडी केल्याचे देशाने पाहिले आहे. महाविकास आघाडी सत्तेत आणण्यासाठी ज्या पक्षाचा संबंध नव्हता, असे पक्ष तत्व गुंडाळून एकत्र आणले. 


आता राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेकडेही पाठ फिरवली जात आहे. सत्ता गेली की तत्व गुंडाळून ठेवतात. त्यामुळे पवार यांना टीका करण्याचा अधिकारच नाही, असे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघ महामंडळाच्या अधिवेशनासाठी अहमदनगरमध्ये आले असता त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली. यावेळी माजी आमदार शिवाजी कर्डिले, माजी जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड आदी उपस्थित होते. शिर्डी येथे झालेल्या राष्ट्रवादीच्या मंथन-वेध परिषदेमध्ये शरद पवार यांनी पंतप्रधान यांच्या धोरणांवर टीका केली.


मंत्री विखे म्हणाले, शरद पवार यांनी संपूर्ण राजकीय कारकिर्दीत अनेक तडजोडी केल्या. महाविकास आघाडी सत्तेत आणण्यासाठी ज्या पक्षाचा संबंध नव्हता, असे पक्ष तत्व गुंडाळून एकत्र आणले. आता राहुल गांधीजींच्या भारत जोडो यात्रेकडेही पाठ फिरवली जात आहे.

शिवसेना हा आमचा नैसर्गिक मित्रपक्ष नाही, असे सांगत काँग्रेसनेही त्यांना सोडचिठ्ठी दिली. सत्ता गेली की आता ते तत्व गुंडाळून ठेवतात. त्यामुळे पवार यांना टीका करण्याचा अधिकारच नाही. महाराष्ट्रात मिशन 100 ची घोषणा देणार्‍या राष्ट्रवादीची बेरीज कुठेतरी चुकत आहे. 

गेल्या तीन-चार निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीला 40 च्या पुढे जागा मिळाल्या नाहीत. ते 40 वर थांबले आहेत. आता यापुढे ती संख्या आणखी कमी होऊ नये यासाठी त्यांनी काळजी घेतली पाहिजे, असा टोलाही महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post