इंस्टाग्रामवरील मैत्रीतून तरूणीवर अत्याचार

नगर ः सोशल मीडियावर ओळख झालेल्या तरूणीला लग्न करण्याचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली आहे.  


पीडित तरूणी गर्भवती राहिल्यानंतर तिला बळजबरीने गर्भपाताच्या गोळ्या खाऊ घालून गर्भपात करण्यास प्रवृत्त केले. याप्रकरणी पीडित तरूणीने दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिस ठाण्यात आरोपी ऋषिकेश अर्जुन दहिफळे (रा. नांदूरनिंबा दैत्य, ता. पाथर्डी) याच्यावर अत्याचार, अ‍ॅट्रोसिटी आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमरावती जिल्ह्यातील रहिवाशी असलेली तरूणी सध्या पारनेर तालुक्यातील एका कंपनीत नोकरीला आहे. जून २०२२ मध्ये इंस्टाग्रामवर तिची ओळख ऋषिकेश अर्जुन दहिफळे बरोबर झाली. त्यांनी एकमेकांचा मोबाईल नंबर घेतला. त्यांचे नेहमी फोनवर बोलणे होत होते. 

एकमेकांवर विश्‍वास बसल्याने त्यांचे प्रेमसंबंध जुळले. ऋषिकेशने फिर्यादी युवतीचा विश्‍वास संपादन केला. ऋषिकेशने तरूणीला अहमदनगर येथे त्याच्या बहिणीकडे बोलून घेतले. तरूणी त्याच्यावर विश्‍वास ठेऊन अहमदनगरमध्ये आली असता ऋषिकेशने तिला बहिणीकडे घेऊन न जाता शहरातील एका लॉजवर घेऊन गेला. 

ऋषिकेशने त्याच्या बहिणीसोबत तरूणीचे फोनवरून बोलणे करून दिले. तसेच लग्नाचे आमिष दाखूवन तिच्यावर अत्याचार केला. दरम्यान, पीडित तरूणी गर्भवती राहिली. तिने ही माहिती ऋषिकेशला दिली असता त्याने बळजबरीने गर्भपात करण्याच्या गोळ्या खाण्यास दिल्या. 

गर्भपात करण्यास प्रवृत्त केले. पीडितीने प्रेमसंबंधाची माहिती तिच्या घरच्यांना दिली. लग्न करणार असल्याचे सांगितले. तिला लग्न करण्यास तिच्या घरच्यांनी परवानगी दिली.

तरूणीने ऋषिकेशकडे लग्न करण्यासाठी विचारणा केली असता, तु वेगळ्या जातीची आहे. त्यामुळे मी तुझ्यासोबत लग्न करू शकत नाही, असे सांगून लग्न करण्यास स्पष्ट नकार दिला. अखेर पीडित तरूणीने कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post