समृध्दीमहामार्गावर गोळीबार

औरंगाबाद : समृद्धी महामार्गाचे उद्घाटन करण्यात आले पण मागील काही दिवसांपासून कधी बैलगाड्या महामार्गावर धावत आहे. आता तर महामार्गावर गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. याबद्दलचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.


समृद्धी महामार्गावर एका तरुणाने हवेत गोळीबार केला असा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा फोटो खरा आहे की नाही याबद्दल अद्याप माहिती समोर येऊ शकली नाही. मात्र पाठीमागे दिसणाऱ्या बोगद्यावरून हा फोटो औरंगाबाद जिल्ह्यातील सावंगी भागातील असल्याचे सांगितले जात आहे. 

हा तरुण हातात गन घेऊन महामार्गावर मध्येच उभा आहे. स्कॉपिर्ओ गाडीसमोर उभा राहून याने हवेत गोळीबार केला असं या फोटोतून दाखवण्यात आलं आहे.

हा फोटो कुणी सोशल मीडियावर टाकला तो खरा आहे की खोटा याबाबत सायबर पोलीस तपासणी करीत आहे. मात्र या फोटोवरून चर्चा मात्र सुरू झाली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post