कडू यांनी व्यक्त केली मंत्रिपदाची इच्छा

पुणे : माजी शालेय शिक्षण मंत्री आणि आमदार बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा आपली मंत्रिपदाची इच्छा बोलून दाखवली आहे. पुढच्या मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपद मिळण्याची इच्छा बच्चू कडू यांनी बोलून दाखवली आहे. 


पुन्हा मंत्री झालो तर आवडेल. त्यातही दिव्यांग मंत्रालयाचं काम करता आलं तर त्यासारखा आनंद नाही. दिव्यांगांच्या प्रश्नांसाठी लढतो. या लढ्याने एक आंदोलनकर्त्याला आमदार आणि मंत्री केलं. त्यामुळे या खात्याचा कारभार मिळाल्यास आनंद होईल, असे बच्चू कडू यांनी बोलून दाखवले आहे.

मंत्रीमंडळ विस्तार माझ्यासाठी महत्वाचं नाही. दिव्यांग मंत्रालयासमोर विस्तार ही लहान गोष्ट आहे. वंचितांचे प्रश्न सोडवले गेले पाहिजेत. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदेजी सांगतील, असंही बच्चू कडू म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post