अजित दादांचे खोके काढले तर नजर पुरणार नाही...

नागपूर : खोक्यांचबाबत अजित दादांच्या तोंडून ही भाषा शोभनारी नाही. जर त्यांचे खोके काढले व एकावर एक ठेवले तर नजर देखील पोहचणार नाही. असे  म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली आहे.


विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. त्याला एकनाथ शिंदे यांनी देखील प्रतिउत्तर दिले आहे.

शिंदे म्हणाले की, आम्ही कोणत्याही कामाला स्थगिती दिली नाही. तर फक्त जेवढा निधी होता. त्याच्या पेक्षा जास्त रूपयांचे टेंडर काढण्यात आले होते. त्याला फक्त स्थगिती दिली आहे.  

एकनाथ शिंदे म्हणाले की, शिंदे-फडणवीस सरकारने दोन मोठे निर्णय घेतले आहेत, या अधिवेशनात नवीन लोकायुक्ताचं विधेयक मांडणार आहोत. महाराष्ट्रात पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांनासुद्धा लोकायुक्तांच्या कक्षेत आणण्याचं काम हा लोकायुक्त कायदा करणार आहे. 

या लोकायुक्तात हायकोर्टाचे किंवा सुप्रीम कोर्टाचे न्यायधीश असतील. तर कायद्यात भ्रष्टाचार विरोधी कायदा सामील करण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post