मतदारसंघातील जनतेला वेडे म्हणणाऱ्या लोकप्रतिनिधीला जनताच धडा शिकवेल....

निघोज : पारनेरची जनता कशी वेडी आहे असा अपप्रचार आजचा लोकप्रतिनिधी बाहेरील मतदारसंघात सांगत तालुक्यातील जनतेचा अपमान करीत आहे. जनतेला वेडा ठरविणाऱ्या लोकप्रतिनिधीला जनताच धडा शिकवेल असा इशारा देत माजी आमदार विजय औटी यांनी आमदार निलेश लंके यांचे नाव न घेता जोरदार टिकाटीपन्नी करीत जोरदार समाचार घेतला आहे. 


पारनेर तालुक्यातील पांढरकरवाडी येथील ग्रामस्थांनी औटी यांनी गेली तीन वर्षांपूर्वी दिलेल्या निघोज - ढवणवाडी - पांढरकरवाडी या साडेचार कोटी रस्त्याच्या कृतज्ञता सोहळा आयोजित कार्यक्रमात माजी आमदार औटी उपस्थितांना मार्गदर्शन करताना बोलत होते. 

यावेळी जिल्हा परिषदेचे बांधकाम समितीचे माजी सभापती काशिनाथ दाते, शिवसेना जिल्हा‌उपप्रमुख रामदास भोसले, माजी पंचायत समिती सदस्य डॉ. भास्कर शिरोळे, शिवसेनेचे तालुका प्रमुख डॉ. श्रीकांत पठारे, शिवसेनेच्या महिला आघाडी प्रमुख प्रियंका खीलारी, संजय मते, संजय ठुबे, उपप्रमुख संतोष येवले, रुपेश ढवण, अशोक शिरोळे, बाळासाहेब ठुबे, संपतराव जाधव, बाजीराव शिरोळे, सुभाष औटी, बाळासाहेब धोत्रे, विशाल घोलप, शरद घोलप, अनिल पुंडे, अभिषेक फुले, भरत खामकर, सुरेश डेरे, नितीन परंडवाल, शिवसेनेचे गट प्रमुख बाबाजी तनपुरे, महेंद्र पांढरकर आदी उपस्थित होते. 

माजी आमदार औटी म्हणाले तालुक्यातील जनता कशी वेडी आहे. याची माहिती देऊन आजचे लोकप्रतिनिधी पारनेरच्या जनतेचा अपमान करीत आहेत ही क्लिप सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे.याचे उत्तर जनताच त्यांना देणार आहे. निवडणुका या पैशाच्या बळावर जिकंता येतात हा ज्यांचा भ्रम आहे. 


तो भ्रमाचा भोपळा लवकरच फुटेल तालुक्यातील जनता स्वाभिमानी आहे. गुणवंत तालुका म्हणून पारनेरचा नावलौकिक राज्यात आहे. विकासकामांची निरंतर प्रक्रिया आपण १५ वर्ष सुरू ठेवली. विकासकामे करताना त्याची गुणप्रत कशी होती हे या साडेचार कोटी रुपये खर्च करुन जो रस्ता तयार झाला.

त्यावरुण नक्कीच येत आहे. महाराष्ट्राचा अर्थसंकल्प समजायला आजचे लोकप्रतिनिधी पात्र आहेत का ही चूक जनतेला उशीरा उमगली आहे. विकासकामे कशी येतात कशी जातात यासाठी अभ्यास करणे आवश्यक आहे. तोच अभ्यास आज नाही ही जनतेची शोकांतिका आहे. 

अडीच वर्षात जे आयते मिळाले तेच गिरवायचे काम उर्वरित काळात होणार आहे. तीन वर्षे आपण वाट पाहिली मात्र तालुका आहे त्याच स्थितीत असल्याने आपण पुन्हा सक्रिय झालो असून पारनेरच्या बाजारतळावर तालुक्यातील जनतेला एकत्र करीत आपण विचारुण राजकारणाची दिशा ठरवणार आहे. राज्याची परस्थीती भयावह आहे. 

अब्दुल सत्तार सारखा मंत्री खासदार सुप्रिया सुळे या भगिनीवर गलिच्छ भाषेत टिका करतो या अपमानाचा बदला राज्यातील जनता वेळेवर घेणार आहे. मुंबई येथील मराठी माणसाला आधार देण्याचे काम शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केले आहे. हीच शिवसेना राज्यातील जनतेचा स्वाभिमान जिवंत ठेवण्यासाठी प्राणपणाने लढणार आहे. 

सत्तेत असताना काही चुका झाल्या आहेत. मात्र विरोधी पक्षाची भूमिका बजावताना विकास झाला पाहिजे हीच संकल्पना राबवीत राज्य विकासाभिमुख झाले पाहिजे ही भुमिका शिवसेना सातत्याने घेत आली आहे. 

जिल्हा परिषदेचे माजी सभापती काशिनाथ दाते यांच्या सभापती पदाच्या कार्यकाळात तालुक्यात सर्वाधिक मोठा निधी उपलब्ध होउन जिल्ह्यात नंबर एकचे कामे तालुक्यात झाली. 

संधीचे सोने करण्याची ताकद दाते आणी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. रामदास भोसले, डॉ.श्रीकांत पठारे, डॉ.भास्कर शिरोळे यांच्या सारखे शेकडो नेतेमंडळी तालुक्यात शिवसेनेचा बालेकिल्ला मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. 

नाही तो आमचा आहे असे समजून जी चूक विधानसभा निवडणुकीत झाली ती चूक तीन वर्षात जनतेला समजली असून यापुढची प्रत्येक निवडणुक ही आपली कसोटी ठरणार आहे. 

निवडणूक जनताच हाती घेत असते. महेंद्र पांढरकर आणी त्यांच्या सहकाऱ्यांनी तसेच ग्रामस्थांनी हा कृतज्ञता सोहळा ठेउन विकासकामे करणाऱ्यांना प्रेरणादायी काम करुन आम्हाला आनंदमय शुभेच्छा देऊन विकासाभिमुख कामांना पाठबळ देण्याचे काम या परिसरातील ग्रामस्थांनी केले आहे. अशाप्रकारे या पुढे संघटीत राहून काम करा असे आवाहन यावेळी आमदार औटी यांनी केले आहे. 

पंचायत समितीचे माजी सदस्य व शिवसेनेचे नेते डॉ.भास्कर शिरोळे यांनी तालुक्यातील गुंडगीरी व अवैध धंदे यावर जोरदार टिका करीत मध्यावधी विधानसभा निवडणुकीचे संकेत देत शिवसेना जनतेचा पक्ष आहे. स्वाभिमान जिवंत ठेवण्यासाठी शिवसेने बरोबर राहण्याचे आवाहन केले. 

यावेळी रूपेश ढवण, महेंद्र पांढरकर,बाबाजी तनपुरे आदिंची भाषने झाली . प्रसिद्ध निवेदक लहू साबळे यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.शेवटी प्रकाश पांढरकर यांनी आभार मानले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post