मुंबई : आजच्या क्षणाला वंचितने ठाकरे गटाच्या शिवसेने पक्षाशी युती केली आहे. आम्ही महविकास आघाडीचा भाग नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसकडून निरोप येईल तेव्हा ठरवू. उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्याशी बोलायचे ठरवले आहेत, अशी माहिती वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिली.
आमच्यावर अजून टीका करावी, त्यातून आमची प्रसिद्धी होत आहे. आम्ही दोघांनी युती जाहीर करताना काँग्रेसच्या सेक्युलरची भाषा आमची भाषा नाही. बाबासाहेब यांची व्याख्या आणि काँग्रेसची व्याख्या वेगळी असल्याचेही ते म्हणाले.
अटल बिहारी वाजपेयी यांच्यानंतर देशाचे नेतृत्व करणारी व्यक्ती तयार झाली नसल्याचे आंबेडकर यांनी सांगितले. ते दोघे आले तर 200 च्या वरती, नाही आले तर 150. आता त्यांनी ते ठरवले पाहिजे की यायचे की नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. शरद पवार यांनी भूमिका घेतली की ते मान्य करतील असे नाही, असेही आंबेडकर यांनी स्पष्ट केलं आहे.
Post a Comment