नगर : अहमदनगर जिल्हा भुमिपुत्राच्या पाठीशी उभे राहणार असल्याचे सूचक वक्तव्य खासदार डॉ. सुजय विखे यांनी केले.
नाशिक पदवीधर निवडणुकीत भाजप कुणाला पाठिंबा देणार याबाबत पक्षाने अद्यापही अधिकृत भूमिका जाहीर केली नाही. मात्र अहमदनगरचे खासदार सुजय विखे पाटील यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीबाबत प्रसार माध्यमांशी ते बोलत होते.
सुजय विखे म्हणाले की, पाठिंब्याबाबत पक्षाची भूमिका अद्याप स्पष्ट नाही. मात्र आम्ही आघाडीच्या उमेदवाराला मतदान करणार नाही, हे स्पष्ट आहे. आम्ही भूमिपुत्र म्हणजेच जिल्ह्यातील उमेदवाराच्या पाठीशी उभे राहणार आहे. दुसऱ्या जिल्ह्यातील उमेदवाराला पाठिंबा का द्यावा? अशी जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांची भावना असल्याने त्यांच्या भावना प्रदेशाध्यक्ष आणि फडणवीसांना सांगणार आहोत.
पक्षाने स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे आदेश दिलेत त्यामुळे जिल्ह्याला जर चांगली संधी मिळत असेल तर त्याचे सोने केले जाईल असे सूचक वक्तव्य केले आहे. सुजय विखे पाटील यांनी सत्यजित तांबेंच्या पाठीशी उभे राहण्याचे सुतोवाच केले आहे. अहमदनगर जिल्ह्यात राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

Post a Comment