नगर ः शिवसेनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते तन-मन-धनाने काम करुन शुभांगीताई पाटील यांच्या विजयासाठी प्रयत्न करतील. त्यामुळे या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या शुभांगी पाटील या मोठ्या मताधिक्क्यांनी विजय होतील यात शंका नाही, असा विश्वास युवा सेनेचे राज्य सहसचिव विक्रम राठोड यांनी केले.
नाशिक पदवीधर मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांनी शिवालय येथे, शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी युवा सेनेचे विक्रम राठोड, उपजिल्हाप्रमुख गिरीष जाधव, माजी महापौर भगवान फुलसौंदर, अभिषेक कळमकर, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, दत्ता कावरे, योगिराज गाडे, शिक्षक सेनेचे अंबादास शिंदे, पारुनाथ ढोकळे, पप्पू भाले आदी उपस्थित होते.
यावेळी शुभांगी पाटील म्हणाल्या, आज अहमदनगर जिल्ह्यात प्रचाराला सुरुवात केली असून आपल्याला नगर जिल्ह्यातून प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचा दावा करत आपणच विजयी होणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. याप्रसंगी भगवान फुलसौंदर, अभिषेक कळमकर, बाळासाहेब बोराटे यांनी शुभांगी पाटील यांच्या विजयासाठी प्रयत्नशील राहू, असे सांगितले.
जिल्ह्यातील पदवीधर मतदारांची संख्या सर्वात जास्त असून, महाविकास आघाडीच्या एकत्रित प्रयत्नाने ही नोंदणी केली आहे. नगर जिल्ह्यातील मतदार हे सुज्ञ असल्याने गेल्या काही दिवसांतील घटना पाहता महाविकास आघाडीवरील विश्वास वाढला आहे. नगर शहरात विशेष संपर्क अभियान राबविण्यात येऊन प्रत्येक मतदारपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला जाईल.

Post a Comment