मुंबई : सध्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिला कसोटी सामना नागपूर येथे खेळवण्यात आला. पहिल्या सामन्यातील तिसऱ्याच दिवशी भारताने जबरदस्त क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजीच्या जोरावर सामना 132 धावांनी जिंकला. या विजयासोबतच भारताची या कसोटी मालिकेत विजयी सुरुवात झाली आहे.
9 फेब्रुवारी पासून सुरु झालेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. परंतु भारताच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलीयाचा हा निर्णय चुकीचा ठरवत अवघ्या 177 धावांमध्ये ऑस्ट्रेलियाच्या सर्व फलंदाजांना तंबूत पाठवले.
यानंतर दुसऱ्या दिवशी भारताचा संघ फलंदाजीसाठी मैदानात उतरला. यावेळी रोहित शर्माच शतक, रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेलच अर्धशतक तर शमीच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर भारताने 400 धावा करून सामन्यावर मजबूत पकड बनवली. भारताने सामन्यात तिसऱ्या दिवशी 223 धावांची आघाडी मिळवत ऑस्ट्रेलिया संघा समोर तगडे आव्हान ठेवले.

Post a Comment