मुंबई : नाशिक पदवीधर निवडणुकीत काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी भाच्यासाठी पक्षाला मामा बनवल असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे काँग्रेसच्या प्रचारापासून चार हात लांब होते. बाळासाहेब थोरात प्रत्यक्षात प्रचारात कुठेही नसले तरी काँग्रेसची व थोरातांची संपूर्ण यंत्रणा सत्याजीत तांबे यांच्या पाठीशी होती, हे स्पष्ट दिसून येत होते.
त्यामुळे थोरातांनी भाच्याला जिंकवून काँग्रेसला मामा बनवलं का?, असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात विचारला जात आहे.
या विषयी गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु आहेत. त्यावर आता मात्र बाळासाहेब थोरात यांनी भूमिका मांडणे गरजेचे आहे. त्यानंतर राजकीय वर्तुळातील चर्चांना लगाम लागेल. अन्यथा या चर्चा सुरुच राहतील.
सध्या चर्चा काही असल्या तरी मतदारांनी मात्र तांबे कुटुंबीयावरील प्रेम मताच्या रुपाने व्यक्त केले आहे. डॉ. सुधीर तांबे यांनी केलेल्या कामाचे सत्यजित तांबे यांचा विजय हे फळ आहे, अशी चर्चा सध्या होत आहे.
Post a Comment