पुणे : कीर्तनकार इंदुरीकर महाराजांचे कीर्तन आवडणाऱ्यांची संख्या मोठी आहेत. अनेक दिग्गज देखील या लिस्ट आहेत. मात्र मला इंदुरीकर महाराजांचा कीर्तन आवडते, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे.
पुण्यात कै. बाळासाहेब दादा पासलकर यांच्या पुण्यस्मरणानिमित्तच्या कार्यक्रमात इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनांचे आयोजन करण्यात आले होते. येथे शरद पवार उपस्थित होते, मात्र पुढील नियोजित कार्यक्रमाला त्यांना जायचे होते. म्हणून शरद पवारांना कीर्तनाला थांबता आले नाही, याबाबत त्यांनी खंतही व्यक्त केली.
मी इंदुरीकर महाराजांचे कीर्तन बघत असतो. मला आजही त्यांचं कीर्तन ऐकायची इच्छा होती. त्यांच्या कीर्तनामध्ये गमती असतात. त्यांची काय ॲक्शन चांगली असते. सामान्य माणसावर कीर्तनातून चांगले संस्कार ते करत असतात, असे पवार यांनी म्हटले आहे.
Post a Comment