राज्यातील वादात मी पडणार नाही.....

मुंबई : राज्यात सध्या सुरू असलेल्या वादात मी पडणार नाही, मी त्याबाबत परवाच माझी भूमिका स्पष्ट केल्याचं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे.


शिवसेना व धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला मिळाल्याने राज्यातील राजकारण चांगलंच तापले आहे. एकीकडे पक्ष व चिन्हा मिळाल्यामुळे शिंदे गटात उत्साह आहे, तर दुसरीकडे ठाकरे गटातून संतप्त प्रतिक्रिया उमटत असल्याच्या पहायला मिळत आहेत. 

उद्धव ठाकरे यांनी शनिवारी ओपन जीपमधून मातोश्रीबाहेर जमलेल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला आहे. याबाबत शरद पवार यांना विचारले असता त्यांनी या विषयावर पुन्हा बोलणे टाळले आहे. मी या वादात पडणार नाही, मी परवाच माझी भूमिका स्पष्ट केल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे.

सध्या निवडणूक आयोगाच्या निर्णयावरून राज्याचे वातावरण चांगलच तापले आहे. याबाबत शरद पवार यांना विचारले असता त्यांनी या वादावर पुन्हा प्रतिक्रिया देणे टाळले आहे. 

देशाच्या दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी आणि काँग्रेस पक्षाचं उदाहरण दिले आहे.हा तर निवडणूक आयोगाचा निकाल आहे. त्याचा निकाल लागल्यानंतर चर्चा काही करता येत नाही. त्याने फार काही होत नसतं. मला आठवतं काँग्रेसमध्ये एकदा इंदिरा गांधी आणि इतर हा वाद झाला. 

त्यावेळी काँग्रेसची बैलजोडी खूण होती. पण ती बैलजोडी निवडणूक आयोगाच्या निकालाने गेली. पण काँग्रेसने त्यावेळी हात चिन्ह घेतले. ते चिन्ह लोकांनी मान्य केले. त्यामुळे त्याचा फार काही फरक पडत नाही. तसेच शिवसेनेच्या बाबतीत लोक नवे चिन्ह मान्य करतील. ही चर्चा महिनाभर चालेल, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post