नारायण राणे अडचणीत....

मुंबई : केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. राणे यांच्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत  यांनी बदनामीचा दावा दाखल केला आहे. काही दिवसांपूर्वी राणे यांनी राऊतांविरोधात वक्तव्य केले होते. 


संजय राऊत हे आपल्यामुळे खासदार झाले. त्यासाठी आपण पैसे खर्च केले असा दावा राणे यांनी केला होता. त्यामुळे बदनामी झाल्याचा आरोप करत राऊतांनी कायदेशीर नोटीस बजावली आहे. 

काही दिवसांपूर्वी नारायण राणे यांनी संजय राऊत माझ्यामुळे खासदार झालेत, त्यासाठी मी पैसे खर्च केल्याचा दावा केला होता. यावरुन राऊत यांनी राणे यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. 

आपली बदनामी झाल्याचा दावा या नोटीस द्वारे करण्यात आला आहे. आता राणे राऊत यांनी बजावलेल्या नोटीसला कसे उत्तर देतात पहावे लागेल.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post