अमर छत्तीसे
श्रीगोंदा तालुक्यातील सहकारी संस्था छत्रपती शिवाजी महाराज खरेदी विक्री संघाची निवडणूकीत सर्वपक्षीय सहमती एक्सप्रेस चे ११पैकी९ उमेदवार निवडून आले आहेत मात्र अपक्ष असणारे प्रदिप औटी यांना पडलेली मते व सोसायटी मतदारसंघात निवडून आलेले दोन अपक्षांचा निकाल मात्र आत्मपरीक्षण करण्यासारखा आहे.
खरेदी विक्री संघाची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी सहमती एक्सप्रेस केली या निवडणुकीत प्रमुख चेहरे फक्त आदेश नागवडे व दत्तात्रेय पानसरे दिसत होते या दोन नेत्यांनी आपली यंत्रणा वापरुन निवडणुकीत ११पैकी९ उमेदवार निवडून आणले आहेत .
सोसायटी मतदारसंघात अनपेक्षित असा निकाल लागला अपक्ष उमेदवार वाळके व शिपलकर हे विजयी झाले आहेत पराभूत उमेदवार हे नागवडे व भोस गटाचे आहेत.
विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे:सोसायटी मतदारसंघ सुभाष काळाने, सुरेश भापकर, सुनिल पाटील, शंकर शिपलकर, भरत भुजबळ, मच्छिंद्र वाळके, वैयक्तिक मतदारसंघ: आदेश नागवडे. नंदकुमार कोकाटे, महिला प्रतिनिधी : मथुराबाई खेतमाळीस, अर्चना पानसरे, अनुसूचित जाती/जमाती नंदकुमार ताडे, इतर मागासवर्ग :शरद जमदाडे.(बिनविरोध), भटक्या विमुक्त : संदीप सोनलकर (बिनविरोध) झाले आहेत.
या निवडणुकीत आमदार बबनराव पाचपुते यांच्या गटाला तीन जागा देण्यात आल्या होत्या मात्र यात शिंदे गटाचे ताडे यांचाही समावेश होता. तसेच नंदकुमार कोकाटे हे भाजपात असले तरी त्यांनी पाचपुतेंचे नेतॄत्व स्विकारले नाही कारण अजूनही खाजगीत मी मुळ भाजपचा आहे असे सांगतात त्यामुळे महिला प्रवर्गातील मथुराबाई खेतमाळीस याच एकमेव निष्ठावंत पाचपुते गटाच्या आहेत त्यामुळे या निवडणुकीत आमदार बबनराव पाचपुते गटाच्या हाती काय आले असा सवाल कार्यकर्त्यांच्यात उपस्थित होत होता.
Post a Comment