राज्यातील मध्यवर्ती कर्मचारी संघटनेने पुकारलेल्या संपास महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जाहिर पाठींबा

नगर : राज्यातील मध्यवर्ती कर्मचारी संघटनेने पुकारलेल्या संपास महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जाहिर पाठींबा दिला आहे, तसे पत्र संघटनेतर्फे प्रसिध्दीस देण्यात आले आहे.


आबासाहेब जगताप यांनी प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्यात मध्यवर्ती कर्मचारी संघटनेने जुन्या पेन्शन सह इतर सर्व मागण्यांसाठी १४ मार्च २०२३ पासून बेमुदत संप पुकारला आहे.  

या संघटनेच्या सलग्न सर्व संघटना संपात सहभागी असून महाराष्ट्र राज्यात अनेक शिक्षक हे नवीन पेन्शन मध्ये आहे. त्या शिक्षक बांधवांना जुनी पेन्शन मिळावी म्हणून आपण महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या व्यासपीठावर येऊन सकारात्मक भूमिका घेतलेली आहे. 

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ मध्यवर्ती संघटनेची संलग्न संघटना नाही. परंतु जे प्राथमिक शिक्षक सन २००५ नंतर सेवेत हजर झालेले आहेत. त्यांना जुनी पेन्शन मिळावी म्हणून संघटनेचे नेते संभाजीराव थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संघटना मध्यवर्ती संघटनेने पुकारलेल्या संपास जाहिर पाठींबा देत आहे, असे पत्र आबासाहेब जगताप, अंबादास वाजे, संभाजीराव थोरात, पोपट सुर्यवंशी, उत्तमराव वायाळ, मच्छिद्रनाथ मोरे आदींनी दिले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post