श्रीगोंदा : रयत क्रांती संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्षपदी प्रतिभा उंडे यांची निवड करण्यात आली. उंडे यांना निवडीचे पत्र रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत तसेच रयत क्रांती संघटनेच्या महिला प्रदेशाध्यक्ष नीता खोत यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले.
श्रीगोंदा तालुका महिला अध्यक्षपदी सुजाता सोमवंशी यांची तर शर्मीला अग्रवाल यांची श्रीगोंदा तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
निवडीचे पत्र रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत तसेच रयत क्रांती संघटनेच्या महिला प्रदेशाध्यक्ष नीता खोत यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले.
यावेळी रयत क्रांती संघटनेचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब मांडे, रयत क्रांती श्रीगोंदा तालुकाध्यक्ष संतोष ढगे मेजर तसेच रयत क्रांती संघटना श्रीगोंदा तालुका युवा अध्यक्ष मच्छिंद्र जठार श्रीकांत शिंदे हे ही उपस्थित हाेते.
या निवडीनंतर उंडे, सोमवंशी व अग्रवाल यांनी संघटन मजबूत करून तळागाळातील प्रश्नांची सोडवणूक करण्याचे आश्वासन दिले.



Post a Comment