नगर ः भिस्तबाग येथील संत किसनगिरीनगरमध्ये श्री समर्थ सद्गुरू किसनगिरीबाबा नगर भक्त मंडळातर्फे 'गुरु दत्त भक्तिधाम' मंदिराच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त श्रीमद् भागवत कथा व ज्ञानयज्ञ सोहळा चे आयोजन करण्यात आले आहे.
श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांच्या कृपेने गुरूवर्य भास्करगिरी महाराज यांच्या प्रेरणेने स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज यांच्या मधुरवाणीतून श्रीमद् भागवत कथा आयोजित करण्यात आलेली आहे. भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते सोमवार १७ एप्रिल २०२३ला सकाळी अकरा वाजता आयोजित केला आहे.
श्रीमद् भागवत कथा सोमवार ते शनिवार सायंकाळी पाच ते आठ व रविवार २३ एप्रिलला सकाळी आठ ते अकरा त्यानंतर भास्करगिरी महाराज व उपस्थित संतांचे शुभाशिर्वाद व यानंतर भाविकांना महाप्रसाद वितरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री समर्थ सद्गुरू किसनगिरीबाबा नगर भक्त मंडळातर्फे करण्यात आले आहे.



Post a Comment