नगर : भाजपमध्ये अंतर्गत गटबाजी सुरू झालेली आहे. या गटबाजीचा फटका मात्र पक्षाला बसू लागला आहे. जिल्ह्यातील ही गटबाजी कधी थांबणार असा सवाल सर्वसामान्य कार्यकर्ते विचारू लागले आहे. त्यामुळे पक्षाच्या नेत्यांनी आता वेळीच लक्ष द्यावे अशी चर्चा आता सुरू झालेली आहे. भाजप आगामी निवडणुकीतफिरवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
जिल्ह्यात भाजप अंतर्गत नोठ्या प्रमाणात गटबाजी असल्याचे समोर आलेले आहे. काही नेत्यांनी तर थेट पत्रकार परिषद घेऊन पक्षातील नेत्यांवर आरोप केलेले आहेत. या आरोपांबाबत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे तक्रारी केलेल्या आहेत. परंतु अद्याप या तक्रारीवर कुठलीच कारवाई झाली नाही. आगामी काळात होईल की नाही हे गुलदस्त्यातच आहे.
जिल्ह्यातील त्या नेत्यांवर भाजपच्या कार्यकर्त्यांची मोठी नाराजी आहे. नानाजी काहींनीउघडपणे व्यक्त केली आहे. काहींनी मनात ठेवले आहे. त्षाचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी निवडणुकात पक्षाला फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
जिल्ह्यातील परिस्थिती भाजप भाकरी फिरवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे संबंधित नेत्याला आता सर्वांना बरोबर घेऊन चालावे लागणार आहे. अन्यथा आगामी काळात त्यांची उमेदवारी जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. आता तरी त्या नेत्याच्या बोलण्यावर वागण्यात सुधारणा होते काय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांची वाढती नाराजी लक्षात घेऊन आगामी काळात जिल्ह्यात भाकरी फिरण्याची शक्यता व्यक्त केली जाते. ही भाकरी विधानसभा निवडणुकीत फिरणार की लोकसभा निवडणुकीत याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्हा दौऱ्यावर आलेले आहेत. त्या नेत्याने पक्ष विरोधी केलेल्या कामकाजाची माहितीची शक्यता व्यक्त केली जात आहे त्यामुळे त्या नेत्याला काळात उमेदवारी नाकारली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
श्रीगोंद्यासह कर्जत व जामखेड तालुक्यातून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या दोन्ही नेत्यांनी या अगोदर जाहीरपणे नाराजी व्यक्त केलेली आहे. ही नाराजी उघडपणे देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे मांडली जाणार आहेते काय ठोस निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भाजपाने जर भाकरी फिरवण्याचा निर्णय घेतला तर आगामी काळात उमेदवारी कोणाला मिळणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. कधी जामखेड तर कधी श्रीगोंदा तालुक्यात ही उमेदवारी जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Post a Comment